प्रतिनिधी , बुलढाणा : लॉकडाउनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रीडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव तयार केला होता आणि त्यानंतर ग्राहकांना दिलासा देऊ अशी घोषनासुद्धा करण्यात आली होती. मात्र आता ऊर्जा खात्याने घुमजाव केला असून वाढीव बिलाच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना वीज विभागाला असे करू देणार नसून वेळप्रसंगी कनेक्शन कापण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याचे कपडे फाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
