प्रतिनिधी : टिटवाळ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमधील टिटवाळा परिसरात राहणारी एक 60 वर्षीय महिला कल्याणहुन निघाली आणि ती थेट राय पुलावर पोहचली.. वयोवृद्ध ही महिला नदीत उडी मारणार होतीच की, त्या रस्त्यावरून पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नजर तिच्यावर पडली. टिटवाळ्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी आणि पोलीस अधिकारी कमलाकर मुंडे यांनी महिलेकडे धाव घेतली आणि तिचा जीव वाचवला. आपल्या मुलगा काही काम नाही करत नाही सारखा त्रास देतो म्हणून ही महिला मुलाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र टिटवाळा पोलिसांनी तिचा जीव वाचवला आहे.
