प्रतिनिधी ,नागपूर : टी.डी.सी. ने म.न.पा. ची परवानगी न घेता उध्वस्त केले त्याचा तिव्र निषेध करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्यामुळे नागपुरसह संपूर्ण विदर्भात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
म.न.पा. ने एम.टी.डी.सी. ला विशिष्ट अटीसह ही जमीन हस्तांतरीत केली होती. अटीची पुर्तता केली नाही त्यामुळे म.न.पा. ने ही जमीन परत मागितली होती असे असताना म.न.पा. ला कोणतीही पूर्व सूचना न देता भा.ज.पा. आमदार श्री. परिणय फुके यांच्या सांगण्यावरून हे सांस्कृतिक भवन उध्वस्त करण्याची अक्षम्य कृती केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा सर्वार्थाने आशिर्वाद लाभलेले आमदार परिणय फुके यांच्या पुढाकाराने ‘भवन’ उध्वस्त करण्यात आले.खरे तर सांस्कृतिक भवना सह पर्यटन स्थळ विकसित करता आले असते परंतु व्यवसायिक एकाधिकार प्राप्त करण्याच्या हेतुने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बददलच्या अनास्थेमुळे जनतेच्या भावना पायदळी तुडविण्याचे अघोरी कृत्य करण्यात आले. म.न.पा. व शासनाच्या पर्यटन विभागाच्या या अक्षम्य कृत्यामुळे समाजात प्रचंड संताप व असंतोष निर्माण झाला आहे. जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होवू नये यासाठी पूर्वीच्याच ठिकाणी सौंदर्यीकरणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे पुनरनिर्माण करण्यात यावे आणि मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणाची एस.आय.टी. मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.म.न.पा. व शासनाच्या पर्यटन विभागाचा निषेध करण्यासाठी 30 ऑगस्ट रोजी विशाल निषेध मोर्चा काढण्यात येईल.
बाईट – जोगेंद्र कवाडे माजी आमदार व अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी
