जनतेज न्युज

परिचारीका बदली धोरणाविरोधात नर्सेस असोसिएशनचे काळ्या फीती लाऊन निदर्शन

प्रतिनिधी , सन २००५ च्या प्रशासकिय बदली धोरणानुसार पारिचारीकांच्याही बदल्या होत आहेत .परिचारीका ह्या तीन शिप्टमध्ये काम करतात , परिचारीकेंचा प्रशासकिय अर्थ व्यवहारासी संबंध येत नाही .परिचारीकांनाही कुटूंबाची जबाबदारी असते त्यामुळे प्रशासकिय बदल्या झाल्यास परिचारीकांची हेळसांड होणार आहे . या धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने आज जिल्हा शासकिय रुग्णालयासमोर काळ्या फिती लाऊन निदर्शने करण्यात आली . शासनाने परिचारीका प्रशासकिय बदली धोरण न बदलल्यास रस्त्यावर उतरून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे .