जनतेज न्युज

निराधार, विधवा महिलांना उत्पन्न दाखल्यासाठी हजारो रुपयांना गंडवल जात आहे

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरातील बार्शीमध्ये तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयाच्या बाहेर निराधार,विधवा आणि वयोवृद्ध महिलांना हजारो रुपयांना गंडवलं जात आहे. ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना, राजीव गांधी योजना अशा योजनांमधून सरकार महिन्याकाठी पेन्शन देत अशा महिलांना शासनाकडून 21 हजार रुपये उत्पन्न असलेला दाखला आणावयास सांगण्यात आले. त्यामुळे अशा निराधार, गरीब,विधवा,वृद्ध महिलांनी मागील आठ दिवसांपासून सेतू कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली आहे, मात्र सेतू आणि तलाठी कार्यालयात मार्गर्शन उपलब्ध नसल्याने आशा अडाणी महिलांना फसवण्याचे काम बार्शीतील एजनटांनी सुरू केल आहे.. एक दाखला काढून देण्यासाठी 2 ते 4 हजार रुपयांपर्यंत महिलांकडून पैसे उकळले जात आहेत, काही महिलांनी आपले सोने तारण ठेवून आशा एजनटांना पैसे दिलेत मात्र या सगळ्या सावळ्या गोंधळावर कुणाचंच नियंत्रण नसल्याचे दिसत आहे सेतू कार्यलयाची मिलीभगत असल्याचेही लोक दबक्या आवाजात बोलताना दिसत आहेत.