जनतेज न्युज

सोलापुरात यशस्वीरित्या पहिल्यांदाच पार पडली ‘लिंग परिवर्तन’ शास्त्रक्रिया

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापुरातील ऍडोरा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच यशस्वीरित्या लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.डॉ. शरण हिरेमठ यांनी ही किमया सोलापुरात करून दाखवली आहे.दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर एका पुरुषाच महिलेमध्ये त्यांनी रूपांतर केल आहे.कुटुंबियांच्या सन्मातीने आणि मानसिकरोग तज्ञांच्या सल्ल्यानंतरच या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येते. लिंग परिवर्तन करणाऱ्यांनी त्यांची ओळख गुपित ठेवली असल्याने त्यांची माहिती मिळू शकलेली नाही आहे. मात्र,सोलापुरात ही शास्त्रक्रिया यशस्वी झाल्याने ग्रामीण भागातील अनेक लिंग परिवर्तन करू पाहणाऱ्यांच्या अडचणींचा मार्ग सुकर झाला आहे.या शास्त्रक्रियेसाठी साधारण १ ते दीड लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती डॉ. शरण हिरेमठ यांनी दिलीय.फक्त लिंग परिवर्तणानंतर या बदल झालेल्या स्त्रीला मुलाला जन्म देता येणार नाही आहे.