जनतेज न्युज

नुकसानग्रस्ताच्या यादीत बोगस नावे, शेतकरी संतापले, 36 शेतकरी करणार आत्मदहन.

प्रतिनिधी , लातुर : अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कारला शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. यात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. यातच महसूल विभागाच्या वतीने योग्य पंचनामे झाले नाहीत. नुकसान ग्रस्तांच्या यादीत बोगस नावे आले असल्याचा आरोप कारला गावाच्या शेतकऱ्यांनी केला आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाचा इशारा कारला येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
चालू वर्षी खरीप हंगामाच्या अखेरीस मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. यात सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली यात मोठ नुकसान झाले. मात्र, औसा तालुक्यातील कारला गावात याचे पंचनामे झाले. या यादीत सधन शेतकऱ्यांची नावे समाविष्ट आहेत. पण अनेक गोरगरीब पात्र शेतकरी वंचित आहेत. जमिनीतील माती वाहून गेल्यामुळे पुढील 10 वर्षे तर शेतीत उत्त्पन्न घेणं अशक्य आहे. शासनाने योग्य मदत केल्यास जगण्यासाठी शेती करता येईल यात गावातील किमान 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. गावातील ग्रामासेवक तलाठी कृषी सहायक यांनी बोगस पंचनामे केले आहेत. या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी व पात्र शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा 36 शेतकरी आत्मदहन करणार, असल्याचा इशारा कारला गावाच्या शेतकऱ्यांनी दिला आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.