प्रतिनिधी , स्वत:ला फ्रंटलाईन वर्कर घोषित करुन केंद्र आणि राज्य सरकारचे कोविड लसीचे नियम पायदळी तुडवून महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांनी घेतली कोविड लस…
फ्रंटलाईन वर्कर म्हणुन ठाणे मनपा महापौर आणि आमदाराने कोरोनाची लस घेतली मग त्यांच्या सोबत करोनाकाळात काम केलेले कार्यकर्ते, NGO फ्रंटलाईनवर्कर नाही का? भाजपा नगरसेवक मनोहर डुंबरे यांचा नरेश म्हस्के आणि रविंद्र फाटक यांच्यावर घणाघात
नेहमी या ना त्या कारणांवरून वादात असणारे ठाणे महानगरपालिकेचे महापौर आता अशा एका वादात सापडलेत की त्यांची चर्चा थेट आता दिल्लीत होवू लागलीये… केंद्र सरकार तसच राज्य सरकारने जारी केलेल्या कोविड लस नियमानुसार सर्वांत आधी पोलिस आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या
फ्रंटलाईन वर्कर्सना कोविडची लस देण्यात यावी मात्र ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक नरेश म्हस्के आणि ठाण्यातील शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांना लस घेण्याची भलतीच घाई होती की काय? त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारचे तसच राज्य सरकारचे नियम पायदळी तुडवून शासनाने केलेल्या आव्हानाला केराची टोपली दाखवलीये… ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांनी कोविड लस घेतलीये… अजब म्हणजे आपण फ्रॅंट लाईन वर्कर आहोत करोना काळात आम्ही देखील रस्त्यावर उतरुन काम केलय मग आम्ही करोना लस घेतली तर काय बिघडले असं धक्कादायक वक्तव्य करत ठाणे महानगरपालिकेने ठरवले त्यामुळे मी लस घेतली अस देखील महापौर नरेश म्हस्के बोललेत मात्र पालिकेने असे काहीही ठरवले नाही असं ठाणे महानगरपालिकेच्या एका उपायुक्त दर्जाच्या अधिका-याने नाव न घेण्याच्या अटीवर माहिती दिलीये याच विषयी आम्ही ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त विपिन शर्मा यांना संपर्क केला होता मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही… नरेश म्हस्के हे तेच महापौर आहेत ज्यांनी फ्रॅंटलाईन वर्कर सोबतच लोकप्रतिनिधींनाही लस द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे २ डिसेंबर रोजी केली होती. मात्र, ती पूर्ण झालेली नाही… पण आता तर थेट नरेश म्हस्के यांनी कोविड लस घेतली त्यामुळे राज्यातच एकच खळबळ उडालीये तर विरोधी पक्ष भाजपाला यामुळे आयता मुद्दा हाती लागलाय…
असा महापौर `झाला नाही होणार नाही’ अशा शेलक्या शब्दात,
ठाणे महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्यावर टिका केलीये… कोरोनाकाळात नागरिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महापौरांनी कोरोनाची लस, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह सर्वांआधी घेतल्यावरून डुंबरे यांनी त्यांना चांगलेच तोंडसुख घेतले आहे… सत्ता आणि पदाचा गैरवापर करत या दोघांनी स्वार्थीपणे लस तर घेतलीच उलट त्याचे फोटोसेशन करत नागरिकांमध्ये चुकीचा संदेश पोहोचवला असून फ्रंटलाईन वर्कर म्हणुन ठाणे महानगरपाकिकेचे महापौर आणि आमदाराने कोरोनाची लस घेतली मग त्यांच्या सोबत करोनाकाळात काम केलेले कार्यकर्ते, NGO संस्था फ्रंटलाईनवर्कर नाही का? असा सवाल देखील भाजपा नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केलाय…
