प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने उद्धट भाषेत आरेरावी केली आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विषयी चुकीचे विधान केले.यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करुन त्याला माफी मागण्यास भाग पाडले आहे.
कल्याण पूर्व भागातील काटेमानीवली परिसरात आर.एल.बी. या फायनान्स कंपनीची शाखा आहे. या शाखेतून एका महिलेने लोन घेतले होते. वारंवार या महिलेला इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी फोन केला जात होता. महिला आपली व्यथा मांडण्यासाठी फायनान्स कंपनीच्या शाखेत पोहचली. याठिकाणी तिला कर्मचारी अनिल भोगे यांनी आरेरावी केली. महिलेशी बोलत असताना या कर्मचाऱ्याने राज ठाकरे आले तरी काही फरक पडणार नाही,असे उद्गार काढले.संबधित महिलेने ही बाब मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितली.
मनसेचे पदाधिकारी उदय वाघमारे, विद्यार्थी सेना, महिला सेना पदाधिकारी व इतर कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले.यानंतर कार्यकर्त्यांनी अनिल भोगे या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्याला उठाबशा काढायला लावून माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही घटना 23 फेब्रुवारी ला संध्याकाळी ही घटना घडली होते
