. भाजप पक्ष या प्रकरणात पहिल्या दिवसापासून विधिमंडळात हा विषय लावून धरतो आहे.
- मानसुख हिरे यांच्या पत्नीने हत्येचा आरोप केला असल्यामुळे वाझें ना निलंबित करून अटक करावी अशी आमची मागणी होती.
. आता कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर चौकशी करून त्यांना अटक झाली आहे.
. आता प्रश्न उभा राहतो तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या “ओसामा बिन लादेन सारखे वाझेंकडे पाहिले जात आहे” या स्टेटमेंटबाबत
. मला मुख्यमंत्र्यांना विचारायच आहे की आम्ही म्हणत नाही ते ओसामा बिन लादेन आहेत, पण ते संशयित आरोपी आहेत, एवढं तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?
. नेमका आता तो कोण आहे यावर भाष्य होण्याची आवश्यकता आहे. या विषयावर मुख्यमंत्री किंवा सरकारची भूमिका आली नाही तर आणखी संशय वाढेल.
. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाझेवर निलंबनाची कारवाई करून, सरकार त्यांना पाठीशी घालत नाही, हे दाखवण्याची संधी आहे, ती संधी ते साधतील का ?
. विरोधी पक्षाकडे पुरावे येतात त्यावेळी जनतेच्या मनात सरकारची विश्वासहर्ता कमी होते. हे सरकारचं अपयश आहे की, त्यांना दस्तावेज मिळत नाहीत, तुमच्याकडे यंत्रणा असून तुम्ही काही करत नाही. त्यामुळे जनता विरोधी पक्षाकडे पुरावे देतात.
. आजच्या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा अर्थ असा काढायचा ?
. नाणार संदर्भात राज ठाकरे साहेबांनी भूमिका घेतल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांच्याकरिता हे प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत का ?
. एका दगडात किती पक्षी मारत आहात आपण ?
. भुजबळ तुमच्यासोबत आहेत आणि सरकारचा भाग आहेत, त्यांच्या संदर्भात आपण कधीतरी वक्तव्य केलंय का ?
. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून हेलिपॅडसंदर्भात जे वक्तव्य केलं ते करायला नको होतं, असं त्यांचं म्हणणं आहे.
. एका बाजूला सत्तेत राहायचं आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या पण टीकाटिपण्या करायच्या, योग्य वाटत नाही.
