प्रतिनिधी , सोलापुरातल्या बाळीवेस परिसरामध्ये एक अनोखा प्रकार पहायला मिळाला,
झाडातून पाण्याच्या धारा सुरु झाल्याचं पाहताच स्थानिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली.
यावेळी गर्दीतून अचानक झाड रडत असल्याच्या अफवा देखील पसरू लागल्या,
मात्र वनस्पतीशास्त्रानुसार ही सगळी प्रक्रिया अगदी सामान्य असून यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नसल्याचं मत वनस्पती शास्त्राच्या अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे.
जुन्या झाडाच खोड कुजल्यानं अशा पद्धतीन पाणी वाहत असल्याच वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक डॉ.एम.एन.जगताप यांनी म्हटलं आहे.
