जनतेज न्युज

पाटबंधारे विभागाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध घोषणा……

प्रतिनिधी , पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी या ठिकाणी असणाऱ्या कोल्हापूर बंधाऱ्याच्या माध्यमातून शिरूर-हवेली आणि दौंड या तीन तालुक्यांना जोडले जात असल्याने या पुलावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे परंतु हा पूल अवजड वाहनांसाठी बंद असला तरी या ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स तोडून या पुलावरून मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहनांची वाहतूक होत असते हा कोल्हापूर पद्धतीचा असणाऱ्या भीमा नदीवरील पूल जवळपास पंधरा ते सोळा गावांच्या शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न मिटवत आहे या पुलाच्या दोन्ही बाजूला कुठल्याही प्रकारची सुरक्षा कठडे नाही सदर काल झालेल्या ऊस वाहतूक ट्रॅक्टर चा अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी या अपघातानंतर आंदोलन करत पाटबंधारे विभागाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध घोषणा देतनिषेध केला.सदर घटने मध्ये चालक विठ्ठल नटकर याचा जागीच मृत्यू झाला असून वाहन चालकाला पुलाचा अंदाज न आल्यामुळे तो भीमा नदी मध्ये कोसळून मोठ्या प्रमाणामध्ये उसाचं नुकसान झाला असून या ठिकाणी मोठी विपरीत घटना घडली आहे पाटबंधारे विभागाला वारंवार विनंती करूनही डोळेझाक करणाऱ्या पाटबंधारे अधिकाऱ्याचा निषेध याठिकाणी केली गेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी विठ्ठलवाडी या शाळेमध्ये शिकण्यासाठी येत आहे त्याच प्रमाणे हलकी वाहने आणि दुचाकी यांचं मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ या पुलावरून असते अशा अपघातामुळे कित्येक जणांचे प्राण गेल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग येणार असा सवाल संतप्त नागरिकांनी यावेळी केला अनेक दिवसांपासून पाटबंधारे विभागाची पाठपुरावा करून सुद्धा या ठिकाणी अवजड वाहनांवर बंदी घातली केली नसल्याचा नागरिकांच्या वतीने आरोप केला जात आहे व या घटनेला सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारे विभाग असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले