शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील …
इंदापूरात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करत विज बिले जाळून सरकारचा केला निषेध…
प्रतिनिधी , इंदापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे भरमसाठ आलेले विज बिल माफ करावे या मागणीसाठी इंदापूरात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी वाढिव विज बिलांची होळी करण्यात आली.. या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने सर्व विज बिल माफीची घोषणा केली होती मात्र आता ते हे माफ करणे शक्य नसून आमची आर्थिक परिस्थिती नाही असे सांगत आहेत त्यावेळेस त्यांनी विज बिलात रिडिंग कमी करू विज बिल माफी देवु असे का सांगितले असा सवाल करत , जर सरकारने सरसकट विज बिल माफ केले नाही तर मोठे तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिलाय ..
