जनतेज न्युज

पीओपी वरील बंदी उठवावी या मागणीसाठी बीडमधील कुंभार समाज आक्रमक

प्रतिनिधि , बीड : पीओपी वरील बंदी उठवावी या प्रमुख मागणी सह विविध मागण्यांसाठी, कुंभार समाजाचे नेते अर्जुन दळे यांच्या नेतृत्वाखाली, कुंभार समाजाने रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. यावेळी पीओपी पासून मुर्त्या बनवण्यास घातलेली बंदी तात्काळ उठवण्यात यावी तसेच कोरोना काळात कुंभार समाज अतिशय डबघाईला आल्यामुळे त्यांना आर्थिक मदत करावी. मूर्तिकारांचे आर्थिक पुनर्वसन करण्यात यावे. मागण्यासाठी कुंभार समाज आक्रमक होतं रस्त्यावर उतरला होता. दरम्यान समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष सुभाष राऊत यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा दिला होता