प्रतिनिधि , धुळे : इंदूर कडून धुळ्याकडे नेली जाणारी 31 गोवंश पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. एका कंटेनरमध्ये हे 31 बैल है कत्तलीसाठी नेले जात होते. धुळे-शिरपूर महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांचा सुगावा लागताच कंटेनरचा चालक आणि वाहक हे घटनास्थळावरून फरार झालेले आहेत. या गोवंशाला एका गोशाळेमध्ये पाठवण्यात आले असून, शिरपूर पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत निर्दयीपणे हवाबंद कंटेनरमध्ये हा गोवंश कत्तलीसाठी नेला जात असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत शिरपूर पोलीस अधिक तपास करीत आहे.
