प्रतिनिधि , यवतमाळ : घाटंजी तालुका हा पाढंर्या सोन्यासाठी प्रसिद्द आहे. कापसाचे उत्पन्न येथे मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे कापूस विक्रीसाठी यार्डवर गाड्यांची गर्दी होत आहे. शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळत असल्याने आवक वाढत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी कपाशीचे उत्पन्न घेतात. या खरीप हंगामात बोंडअळी व बोंडसडमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही शेतकर्यांना समाधानकारक कापूस झाला आहे. शेतकर्यांनी कापूस विक्रीसाठी आधीच ऑनलाइन नोंदणी केली होती. मात्र, शासकीय खरेदी केंद्रे उशीरा सुरू झाली. सीसीआयच्या खरेदी भाव पाच हजार 725 आहे. तर व्यापारी पाच हजार 300 ते पाच हजार पाचशे रुपये भावाने कापसाची खरेदी करीत आहे. खासगीत कमी भाव असले तरी पैसे रोख मिळते. तर सीसीआय जास्त भाव देत असले तरी चुकारा मिळण्यासाठी एका महिन्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतकर्यांचा कल व्यापार्यांकडे जास्त वळताना दिसत आहे. कापसाची रोजची आवक सातेशे ते आठशे गाड्यांची असून मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी पाहावयास मिळते. नवीन कापूस यार्डचे बाधंकाम बर्याच वर्षांपासून रखडलेले आहे ते त्वरीत पूर्ण झाले तर शेतकर्यांना मोठा दिलासा मिळेल. शासनाचा नवीन नियम 150 गाड्या किंवा तीन हजार क्विंटलपेक्षा जास्त कापूस खरेदी करू नये, असा नियम आहे. त्यामुळे आता व्यापार्यांचे चागंभले निश्चित होणार आहे.
