जनतेज न्युज

महानगरपालिकेने परवाना शुल्क व्यापाऱ्याकडून वसूल करू नये, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे

प्रतिनिधि , औरंगाबाद : महानगरपालिका परवाना शुल्क व्यापाऱ्याकडून वसूल करणार अशी काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती. मात्र औरंगाबाद जिल्हा व्यापारी संघाने आज महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन परवाना शुल्क आकारू नये यासाठी निवेदन दिले. यावर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याकरता शासनाच्या निर्देशानुसार बाजारपेठ बंद होती. या बंदीच्या काळामध्ये शहरातील नागरिकांना उद्योजकांना, व्यापारी बांधवांना, मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे महानगरपालिकांनी परवाना शुल्क व्यापाऱ्यांकडून वसूल करू नये. जर महानगरपालिकेने परवाना शुल्क व्यापाऱ्याकडून आकारल्यास तर व्यापारी महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी काळे यांनी दिला.