जनतेज न्युज

कर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच ,मोबाईल ऍप्स कडून तरुणांना लोन वसुली करीता धमकावण्या चे प्रमाण वाढले.

प्रतिनिधि , जालना : जलद व विना अडचण कर्ज मिळण्याची वचने देणाऱ्या , अनाधिकृत डिजिटल मंचांना मोबाईल ऍप्सना , व्यक्ती , छोटे उद्योग वाढत्या प्रमाणावर बळी पडत असल्याचे रिपोर्टस येत आहेत . या रिपोर्टसमध्ये , कर्जदारांकडुन अत्याधिक व्याज दर व छुपे आकार मागण्यात येत असून कर्ज वसुलीसाठी अस्वीकार्य व दडपशाहीच्या रीती अनुसरण्यात येत असल्याचे आणि कर्जदारांच्या फोन्सवरील डेटा मिळविण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात आहे. आरबीआयकडे पंजीकृत केल्या गेलेल्या बँका , वित्तीय कंपन्या ( एनबीएफसी ) आणि संबंधित राज्यांच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियमासारख्या वैधानिक तरतुदीखाली राज्य सरकारकडुन विनियमित केल्या गेलेल्या इतर संस्था कर्ज देण्याच्या कायदेशीर कार्यकृती करत आहे.

हे जे छोटे मोठे लोन देणारे आप आहे तरुणांना किंवा छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना लोन देतात खरे पण जर पाच हजार रुपये लोन दिले तर आपल्या हातात तीन हजार रुपये जमा होतात व सहा हजार रुपये सात ते आठ दिवसात जमा करावे लागतात तसे न केल्यास नातेवाईकांना फोन कॉल करून तुमची बदनामी करू व कधी काळी तर कॉल करून वसुलीसाठी धमकावतात सुद्धा. हा प्रकार कुठेतरी थांबायला पाहिजे.