जनतेज न्युज

सर्व सामान्य जनता या वेळेस प्रवास करत नाही – हरेश सुतार – मीरा – भायंदर शहर संघटक ( मनसे )

प्रतिनिधि , मुंबई : 10 महिन्यांपासून बंद असलेली मुंबई लोकल ट्रेन नवीन वर्षात कधी सुरु होणार यावर सर्व सामान्य नागरिकांचे काटेकोर पणे लक्ष लागले असून याबाबत महाराष्ट्र सरकार सर्व सामान्यांसाठी लवकरच रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत लोकल ट्रेन सुरु करण्याच्या विचारात असून याबाबत सामान्य मुंबई करांना दिलासा मिळेल अशी शक्यता असली तरी सामान्य चाकरमानी या वेळेत प्रवास करतो का?
याबाबत मात्र शंखा उपस्थित होत आहे.
ट्रेन बंद असल्यामुळे हातावर पोट असणारे सर्व सामान्य मुंबईकर आणि विशेष करून मीरा भायंदर विभागातील कर्मचाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहे. लोकल ट्रेन बंद असल्यामुळे त्यांना पश्मिम ध्रुतगती मार्गाचा वापर करावा लागतो परिणामी रस्त्यांवर फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते व तासंतास सामान्य प्रवास्यांना या वाहतूक कोंडीचा रोजच सामना करावा लागतो.
लोकल ट्रेन सुरु झाल्याने ह्या ट्राफिक वर काही प्रमाणात का होईना पण समाधान नक्की मिळेल.
या बाबत हरेश सुतार – मीरा – भायंदर शहर संघटक ( मनसे )
यांनी माहिती दिली.