जनतेज न्युज

पुण्यातील रुग्णालये अद्ययावत करण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडून ५० लाखांची मदत

प्रतिनिधी , पुणे : संपूर्ण देशात कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे.यासह राज्यातही कोरोनाचे संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच झाली आहे . यापार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेची रुग्णालये अद्ययावत करण्यासाठी पल्या आमदार निधीतून ५० लाख निधी उपलब्ध करुन दिला आहे. यासंदर्भात पाटील यांनी आज पुण्याचे महापौर आणि आयुक्तांना पत्र कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आलिहिले आहे .

पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अद्ययावत साधन समुग्रीची कमतरता भासत आहे. याची दखल घेऊन पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, कोरोनाग्रसतांवर उपचारासाठी अजून निधीची गरज असल्यास निधीची उभारणी करु, असे देखील पाटील यांनी कळवले आहे. दरम्यान पाटील यांनी संवेदना फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने २० हजार मास्क तयार करुन घेऊन पुण्याचे महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्याकडे सुपूर्द केले. या मास्कचे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी, पोलीस कर्मचारी, पत्रकारांना आणि विविध रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर, परिचारिका यांना वाटप करण्यात येणार आहे.

दरम्यान देशात लॉकडाउन असल्यामुळे गोरगरिबांचे हाल सुरू आहेत. हातावर पोट असणाऱ्यांना पोट भरायची पंचायत आहे. या हलाकीच्या परिस्थितीमध्ये देवस्थाने, स्थानिक नेते आणि विविध सामाजिक संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत. कोथरूड मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्र भाजपाचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मतदार संघातील लोकांसाठी उपक्रम हातात घेतला आहे. त्यांनी गरजूंसाठी पोळीभाजी आणि औषधांची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.