जनतेज न्युज

पोलिसांचा टिकटॉक व्हिडिओ बनवणारे पाच जण अटकेत

प्रतिनिधी , मुंबई : पोलिस कर्मचाऱ्याने ऑटो रिक्षा थांबवून पैसे मागितल्याचा टिकटॉक व्हिडिओ बनवल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अविनाश वर्मा (२६)), जलीम सिद्दीकी (२०), सलमान शेख (२२), साजिद शेख (२४) आणि नफीझ अन्सारी (२८) यांना कोविड -१९ लॉकडाउन आणि निषेधात्मक आदेशांचे उल्लंघनच नव्हे तर बदनामी केल्याबद्दल सोमवारी अटक करण्यात आली.

रविवारी डोंगरीमध्ये टिकटोकचे व्हिडिओ बनवल्याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद शेख (२४) आणि आसिफ शेख (१९) या दोन तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी भेंडी बाजारपेठेत त्यांची परेड काढली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.