जनतेज न्युज

पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार भुसावळमध्ये रात्री बाहेर फिरणार्याची कोरोना केलीजाते टेस्ट

प्रतिनिधी , जळगाव : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .प्रवीण मुंडे यांच्या आदेशानुसार आज पासून रात्रीच्या संचारबंदी वेळेमध्ये जे नागरिक रस्त्यावरती बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांची त्याच ठिकाणी ॲटिजंट रॅपिड टेस्ट करण्यास भुसावळ मध्ये सुरुवात करण्यात आली आहे
भुसावळ नगरपालिकेतील पालिकेतील डॉक्टर्स व कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या वतीने शहरातील अष्टभुजा चौकामध्ये संचार बंदी च्या कालावधीमध्ये जे काही नागरिक बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांना पकडून त्यांची ॲटिजन रॅपिड कोरोनाची टेस्ट केली जात आहे यामध्ये जे नागरिक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत अशा रुग्णांना तात्काल विलगीकरण कक्षा मध्ये भरती केले जाणार आहे त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण सापडतील व इतरांना त्यांच्यापासून प्रसार होणार नाही हा उद्देश बाळगून या टेस्ट करण्यात येत आज पन्नास नागरिकांच्या कोरोना टेस्ट केल्या यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण निघाला नसल्याची असल्याची माहिती भुसावळ नगरपालिका हॉस्पिटलचे डॉ. तोसिफ खान यांनी माहिती दिली आहे