जनतेज न्युज

गुढीपाढव्याच्या दिवशीही संगमनेरमधील ऊसतोडनी कामगारांची चुल बंद; ऊसतोड कामगारांनी मांडल्या व्यथा

प्रतिनिधी , अहमदनगर : महाराष्ट्रात वाढता करोनाचा प्रादुर्भाव यामुळे मिनी लॉडाऊनचे कडक नियम ,अशा दुहेरी कचाट्यात उसतोडी कामगार सापडल्यामुळे ऊस कामगारावर करोना महामारीची गुढी भरण्याची वेळ आली .पूर्ण भारत देशात हिंदू नवीन वर्षाचे जल्लोषात गोड-धोड करून स्वागत करण्यात येत आहे. पण सर्वसामान्य हातावर मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्या आणि कामगारांच्या घरात आज आनंदाची चुल पेटली नाही, ही फार मोठी शोकांतिका बघायला मिळत आहे . कारण करोणाचा वाढता प्रादुर्भाव आपले घरदार परिवार सोडून दोन जिल्ह्यांच्या सीमा बदलून हे कामगार वर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी कारखान्यात ऊस तोडीचे काम करतात .आणि आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करतात ,ऊस तोडी नंतर घरी जायचे कसे ,आणि कारखाने बंद झाल्यानंतर करोणा व लॉकडाऊनच्या काळात परिवाराचं पोट भरायचं कसं ही फार मोठी समस्या ऊसतोड कामगारांच्या समोर उभी आहे .त्या वेळी होणाऱ्या परिस्थितीत महिला वर्ग संपूर्ण परिवार आहे अशा .दुर्बल दुर्लक्षित हातावर पोट भरणाऱ्या लोकांकडे मायबाप सरकारने लक्ष द्यावे एवढीच इच्छा व्यक्त केलीये.