जनतेज न्युज

प्रकल्पग्रस्त बाधित नागरिकाना बीएसयूपीचे हजारों घरे बांधून तयार असून घरे मिळत नसल्याने काँग्रेसचे साखळी उपोषण

प्रशासनाने लक्ष दिले नाही तर आंदोलन उग्र करूत घराचा ताबा घेण्याचा कॉंग्रेसचा इशारा

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रकल्पग्रस्त घरांसाठी वंचित असल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणात घडत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महानगर पालिकेकडून प्रकल्पग्रस्त बधितांना घरे दिली नाहीत तर तयार घरांवर ताबा मिळवणार असल्याचा इशारा देत काँग्रेस कडून साखळी उपोषण सुरू केले आहे

कल्याण पश्चिम पालिका क्षेत्रात येणारी जुनी गोविंद वाडी रस्ता रुंदीकरणात तेथील शेकडों नागरिकांची राहत असलेल्या घरांवरून महापालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आल्याने येथील रहिवाशी रस्त्यावर आली आहेत. प्रकल्पग्रस्त बधितांना नवीन घरे देण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्तांकडून देण्यात आले होते. मात्र या घटनेला तब्बल दहा वर्षे उलटून गेली तरी नवीन घरांचे आश्वासन कागदावरच राहिल्यामुळे येथील नागरिकांमध्ये महापालिका विरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिके कडून पात्र ठरवण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त नागरिकांना पालिका प्रशासन आजही नव्या घरांचा ताबा देण्यास असमर्थ ठरलेली आहे. परिणामी पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकल्पग्रस्त नागरिकांना घरे मिळण्याचे पत्र महापालिकेकडून देण्यात आले होते. मात्र तब्बल दहा वर्षे उलटूनही बाधितांना घरांसाठी संघर्ष करावा लागत आहे. कोरोना काळा असल्यान गेल्या दोन वर्षापासून प्रकल्पबाधित नागरिकांना आता भाड्याने राहत असलेल्या घराचे भाडेही देणे जमत नसल्याने प्रकल्प ग्रस्त लाभार्थीना घरे मिळावी यासाठी कांग्रेस पार्टी आक्रमक झाली असून काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाविरोधात साखळी उपोषण सुरू केले असून पालिकेने यावर कुठलाच निर्णय घेतला नाही तर येत्या काळात घरावर जबरदस्ती ताबा घेत बंड पुकारणार असल्याचा इशारा कांग्रेस पार्टी करून देण्यात आला आहे