जनतेज न्युज

प्रतिक्षा संपली, कोरोना लसीकरणाला सुरुवात

प्रतिनिधी , मुंबई : आज संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यातील लसीकरणाला आज सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता, समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. आज पुर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी हे लसीकरण पार पडत आहे. त्या निमीत्ताने ज्या नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यांच्या याबाबत काय प्रतिक्रीया आहेत. हे त्यांच्या तोंडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतील BKC या ठिकाणी लसीकरणासाठी जमलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी आपण संवाद साधला आहे