जनतेज न्युज

बनावट पॅनकार्ड आधार कार्ड बनवून बँकेकडून लोन मंजूर करणारी टोळी गजाआड.

प्रतिनिधी , नवी मुंबई : बनावट पॅनकार्ड आधार कार्ड बनवून बँकेकडून लोन मंजूर करणारी टोळी अखेर एन आर आय पोलिसांनी गजाआड केली आहे यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे
मागील काही दिवसांपासून नवी मुंबई मधील इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये जाऊन मोबाईल खरेदी करून त्यासाठी एचडीएफसी बँकेतून बनावट आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे वापरून बँकेच्या कर्मचाऱ्यांना ते खरे असल्याचे दाखवून सिबिल स्कोर चेक करायला लावून त्याद्वारे एचडीएफसी बँकेकडून लोन मंजूर करणे मोबाईल खरेदी करणे व घेतलेलं परत न करणे असा प्रकार चालू होता. त्याबाबत एचडीएफसी बँकेचे व्हीलीलनस इन्वेस्टीगेशन ऑफिसर रजीत कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून एन आर आय सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणी गीता गुप्ता उर्फ पुनम जयस्वाल तोटो उर्फ नेहा कटियार उर्फ नेहा अन्सारी या पुण्यात राहणार्‍या महिलेला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपासा दरम्यान अटक केलेला महिलेचा फोटो असलेले वीस आधार कार्ड वीस पॅन कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता, अटक महिलेकडे त्या अनुषंगाने चौकशी केली असता, तिने हा गुन्हा शोएब शेख अक्रम शेख, उर्फ दीपक कुमार यांच्या मदतीने करत असल्याचे सांगितले. या दोघांनाही पुण्यातून अटक केली आहे.तसेच आरोपी शोएब शब्बीर शेख याच्याकडून देखील नऊ बनावट पॅन कार्ड आधार कार्ड असे एकूण 58 आधार कार्ड पॅन कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत.