जनतेज न्युज

बारावीत साक्षीने मिळविले 90 टक्के गुण, इंग्रजी पेपरच्या दिवशी झाले होते वडिलांचे निधन

प्रतिनिधी, वाशिम : बारावीच्या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी वडिलांचे निधन झाले. घरात वडिलांचा मृत्यूदेह असताना साक्षीने परीक्षा केंद्र गाठून पेपर दिला काल 12 वीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये साक्षी बोरकर हिने 90 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. रिसोड तालुक्यातील वडजी येथील शेतकरी रामेश्वर शेषराव बोरकर यांचे 4 मार्च रोजी निधन झाले होते. त्याच दिवशी मुलगी साक्षीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता घरात वडीलांचा मृत्यूदेह असताना स्वतःला दुःखातून सावरून साक्षीने पेपर देण्याचा निर्णय घेतला साक्षी चा पेपर संपल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय ही नातेवाईकाने घेतला होता.त्यामुळे साक्षीने सकाळी 11 ते 2 या वेळेत परीक्षा दिली,काल जाहीर झालेल्या 12 वीच्या निकालात साक्षीला तब्बल 90 टक्के गुण मिळाले असून इंग्रजीच्या पहिल्या पेपर मध्ये तिला 79 गुण मिळाले आहेत,तिच्या ह्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून इतरांनीही संकटकाळात न डगमगता ताकदीनिशी संकटाचा सामना केल्यास यश संपादन होऊ शकते हे साक्षीने दाखवून दिले आहे.