जनतेज न्युज

बिबट्याच्या हल्ल्यातील मयत कुटुंबाचं धनंजय मुंडेंनी स्वीकारलं पालकत्व..!

प्रतिनिधी , बीड : बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांची, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली.यावेळी धनंजय मुंडे यांनी गर्जे कुटुंबीयांचे सांत्वन करून, त्यांना धीर दिला. तर शासनाच्या वतीने देण्यात येणारी रोख पाच लाखाची मदत सुपूर्त केली.तर उर्वरित 10 लाख एफडी केले.दरम्यान मयत नागनाथ गर्जे यांच्या पत्नीला नोकरी व त्यांच्या 2 मुलांचे पूर्ण शिक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी यावेळी घेतलीय.दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नांदेड , जालना , उस्मानाबाद , नगर , जुन्नर , पुणे या परिसरातील टीम पाचारण करण्यात आल्या आहेत.टीम आल्यानंतर 48 तासात बिबट्याला पकडण्यात येईल.अशी माहिती मीडियाशी बोलतांना धनंजय मुंडेंनी दिली..