प्रतिनिधी , परभणी : परभणी शहरातील विकास नगर येथे राहणाऱ्या तसेच बालविद्या मंदिर या शाळेत सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजय डाके या विद्यार्थ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेखांकित केलेला चित्र त्यांना 23 ऑक्टोबरला पोस्टाने पाठवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी अजय डाके या विद्यार्थाला पत्राच उत्तर 25 नोव्हेंबरला पाठवून त्याचा धन्यवाद आणि कौतुक केलाय. पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तरामुळे अजय डाके आणि त्याचे कुटुंबीय प्रचंड खुश आहे . पंतप्रधानांनि कौतुक कलेला पत्र मिळाल्यानंतर अजय याचे जिल्हाभर कौतुक होत आहे
