प्रतिनिधी , पुणे : बिष्णोई गँगमधील मोठे गुन्हेगार आहेत हे आपले वर्चस्व दाखवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षण बनवण्याचे काम करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वेगवेगळे फोटो बनवून रिल्स बनवून ते तरुणांना आकर्षित करून मोठे गुन्हे करण्यासाठी त्यांचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेक तरुण या गोष्टीला बळी पडत आहेत, त्यामुळे या गोष्टीला तरुणांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आज अभिनव देशमुख बोलत होते.
यावेळी देशमुख म्हणाले की, चांगल्या घरातली मुले सुद्धा गुन्हेगारांच्या सोशल अकौंटला फॉलो करतात. लाईक करणं किंवा फॉलो करणं हा काय गुन्हा नाही. परंतु, आपल्या ट्रेंड कळतो की आजची तरुण पिढी आहे तिला कुठलं अट्रेक्सन आहे समजते, नुसतं गुन्हा दाखल करून काही होणार नाही. त्या मुलांच्यापालकांचे समुपदेशन करणे देखील करणार आहोत, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिली.
