जनतेज न्युज

सोलापुरात 8 लाख 40 हजार रुपयांची विदेशी दारू जप्त

प्रतिनिधी, सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने आज सोलापुरात मोठी कारवाई करण्यात आलीय. शहरातील गेंट्याल टॉकीज येथून 8 लाख 40 हजार रुपयांचा विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्ककडून जप्त करण्यात आलाय. पहाटे साडेतीन वाजता शहरातील गेंट्याल टाकीज चौक येथे सापळा रचून एका टेंपो वाहनातून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचा साठा पकडलाय. जप्त केलेल्या दारूची किंमत 8 लाख ४० हजार ९६० रुपये इतकी असून वाहनाच्या किमतीसह एकूण १४ लाख ४० हजार ९६० रुपये किंमतीचा मुद्देमाल सदर कारवाईत जप्त करण्यात आलाय. दरम्यान यामध्ये अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय.