जनतेज न्युज

बुलडाण्यात ‘कोविशील्ड’ लस दाखल … पहिल्या टप्प्यात डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफमधील कर्मचाऱ्यांना मिळणार लस…

प्रतिनिधि , बुलडाणा : केंद्र सरकारने भारत आणि सीरमच्या दोन कोरोना लसींना परवानगी दिली आहे. कोरोनाबाबत येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. 19 हजार कोविड लसीचा पहिला साठा बुलडाण्यात दाखल झाला आहे…

व्हिओ – केंद्र सरकारने भारत आणि सीरमच्या दोन कोरोना लसींना परवानगी दिली आहे. कोरोनाबाबत येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. 19 हजार कोविड लसीचा पहिला साठा बुलडाण्यात दाखल झाला आहे .बुलडाणा जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या विशेष वाहनाने ही लस अकोल्याहून बुलडाण्यात आणण्यात आली आहे. बुलडाण्यातील जिल्हा परिषदेतील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवण्यात आहे. बुलडाण्यातील ७ सामान्य रुग्णालयांची लसीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात शेगांव, खामगांव, मलकापूर, बुलडाणा, चिखली, देऊळगांवराजा, मेहकर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना लस पोहोचविली जाणार आहे.आणि 16 जानेवारी ला ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे यांनी दिली आहे.