प्रतिनिधी , अमरावती जिल्यात व्यापार वाढावा यासाठी बेलोरा येथे विमानतळ तयार करण्यात येतंय. कोरोना नंतर याठिकानी कंत्राटदारांना निधी उपलब्ध झाला नसल्याने या ठिकाणची कामे संथ गतीने सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी बेलोरा विमानतळाची पाहणी केली. दरम्यान आढावा सुद्धा घेतला. राज्य सरकारने या करिता ५० कोटीचा निधी लवकरात लवकर दिला तर येणाऱ्या २०२२ पर्यंत या ठिकाणी सुरू होईल असा विश्वास देखील व्यक्त केला. यासाठी राज्य सरकारकडे विनंती देखील खासदार नवनीत राणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
