जनतेज न्युज

ब्रिटनमधून महाराष्ट्रातील दाखल झालेले आठ प्रवासी नवीन कोरोना विषाणू बाधीत-आरोग्यमंत्री राजेश टोपे

प्रतिनिधी , जालना : ब्रिटन मधुन महाराष्ट्रात दाखल झालेल्या प्रवाश्यांमधील आठ प्रवासी नवीन कोरोना विषाणूने बाधीत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या प्रवाश्यांमध्ये मुंबईतील पाच, ठाणे, मीरा भाईंदर,आणि पुण्यामधील प्रत्येकी एक रुग्णाचा सामावेश असल्याची माहीती त्यांनी दिली आहे. हे सर्व रुग्णांची रवानगी विलगीकरण कक्षात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असल्याची माहिती ही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.
घेण्यात आलेल्या स्वॅब पैकी ४३ जणांचे स्वॅब पाझिटीव्ह आढळून आले होते. त्यापैकी आठ जणांचे अहवाल हे यूके’च्या नविन वायरसच्या स्ट्रेनचे आढळून आले आहे. त्यामुळे आपल्याला या रुग्णांसाठी वेगळ्या पद्धतीने प्रोटोकॉल करावा लागणार आहे. म्हणून या सगळ्या रुग्णांसाठी चौदा दिवस आणि जे कॉम्प्रमाईज इम्युनिटी चे आहेत त्यांना २१ दिवस अशा प्रकारचा A सिप्म्टेमॅटिक प्रोटोकॉल पाळावा लागणार आहे. या सर्व रुग्णांचे ट्रेकिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चे काम जलद गतीने सुरू असुन, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या नवीन व्हायरस चे गुणधर्म हे अधिक संसर्ग होणारे आहेत, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून आपल्याला मास्क आणि सोशल डिस्टंसिंग हे सुरु ठेवणे आवश्यक आहे असल्याच त्यांनी सांगितलं आहे. ही माहिती त्यांनी आपल्या ट्विटर वरुन दिली आहे.