प्रतिनिधी , धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एकूण 34 ग्रामपंचायत निवडणूक लागली होती आज अखेर माघारीच्या शेवटचा दिवस असल्यामुळे तहसील कार्यालयात पॅनल प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तालुक्यातील एकूण 6 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्यामुळे तहसील कार्यालयात जल्लोषाचे वातावरण होते दिवसभराच्या गर्दीचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे शिरपूर शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अनेक ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी किरकोळ वादही झाल्यामुळे काहीसे तणावाचे वातावरण होते उमेदवारांचे सर्व माघारी चे प्रतिक्रिया संपल्यावर उर्वरित लढत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले निवडणुकीच्या संपूर्ण प्रतिक्रियेवर तहसीलदार आबा महाजन हे लक्ष ठेवून होते
