प्रतिनिधी , जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्य आतील मंडप नाला व करंजपाणी या दुर्गम भागात मध्यप्रदेशातील शिकारी टोळीने वस्ती वरील वनरक्षकाच्या पथकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही
परिमंडल कक्ष तीन क्रमांक 104 मध्ये वनरक्षक विजय गोरख शिरसाट हे आपले सहकारी लेदा सिताराम पावरा काळूबाळू पवार आश्रम मुराद तडवी यांच्यासह पाहणी करत होते त्यावेळी नाला वरील परिसरातील दहा ते पंधरा जणांचे टोळके दिसून आले त्यापैकी अनेक लोकांकडे शस्त्र आढळून आली वनरक्षकांची चाहूल शिकाऱ्यांना लागल्यानंतर त्यांनी पळ काढला त्यानंतर वन रक्षकांनी आपला पाठलाग करत असल्याचे समजल्यावर त्या टोळीतील काही जणांनी वनरक्षकाच्या दिशेने बंदुकीतून गोळ्या झाल्या वनरक्षक आकडे शस्त्र नसल्याने सर्वांनी झाडाचा आडोसा घेऊन आपले जीव वाचवले
