प्रतिनिधी , घोटीच्या कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी सालाबादप्रमाणे (वर्ष २४ वे) कळसुबाई शिखरावर पहाटेच चढाई करून सूर्योदय वेळी कळसुबाई मातेचा अभिषेक व आरती करून गुढीचे पूजन केले व राज्यातील सर्वोच्च शिखरावर गुढी उभारण्यात आली. ह्यावेळी कोरोना नावाच्या राक्षसाचा वध करून मानवाला ह्या महामारीतून मुक्त करून सर्वाना हिंदू नूतन वर्ष सुखाचे ,आनंदाचे ,आरोग्यदायी जाऊदे अशी कळसूबाई मातेला गिर्यारोहकांनी साकडे घातले. तसेच कळसुबाई शिखरावर पूर्वसंध्येला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ.बाबासाहेबांची १३० वी जयंती साजरी केली. गिर्यारोहकांनी मास्क घालून, सामाजिक अंतर ठेवून ,सेनिटाईझरचा वापर करून शासनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम संपन्न केला.ह्या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, मनसे उपजिल्हा अध्यक्ष आत्माराम मते, बाळू आरोटे, निलेश पवार, अशोक हेमके,काळू भोर,प्रवीण भटाटे, उमेश दिवाकर, सोमनाथ भगत,संकेत वाडेकर, पुरुषोत्तम बोराडे,ज्ञानेश्वर मांडे ,देविदास पाखरे,संदीप परदेशी ,कृष्णा बोराडे, पुष्कर पवार व इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.
