प्रतिनिधी , अहमदनगर : अकोले तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून या पुढील काळ अतिशय सावध राहण्याची असून वृध्द व्यक्तींनी शक्यतो घरात थांबून प्रशासनाला मदत करा असे आव्हान माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले आहे .त्यांच्या सूचनेप्रमाणे आज राजूर येथे दोनशे खाटांचे कोविहिड केंद्र सुरू करण्यात आले .माजी आमदार वैभव पिचड,तहसीलदार मुकेश कांबळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ इंद्रजित गंभी रे,सरपंच गणपत देशमुख,सहायक फौजदार नितीन खैरनार,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम पन्हाळे,सुधीर ओहरा,भास्कर एल मामे,पत्रकार संघाचे सदस्य,आदिवासी विकास प्रकलपाचे शेनकर,गणेश पंडीत,राजूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.दिघे, डॉ.शिंदे,डॉ.बाबासाहेब गोडगे,महसूल चे बांबले,ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नाडेकर उपस्थित होते.राजूर येथील आदिवासी विकास विभागाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह तसे च औद्योगिक प्रशिक्षण संस्था या तीन ठिकाणी कोरोणा केयर सेंटर उभारण्यात आले .त्यासाठी जेवण राजूर ग्रामपंचायत,औषदे,व्यापारी संघटना,सामाजिक कार्यकर्ते स्वच्छता साठी राजूर ग्रामपंचायच,आदिवासी विकास,आरोग्य कर्मचारी तसेच खाजगी डॉकटर यासाठी प्रयत्नशील असेल तर संरक्षण व शिस्ती साठी पोलिस होमगार्ड कार्यरत राहणार आहेत .प्रसंगी माजी आमदार वैभव पिचड यांनी आपले कुटुंब आपली जबाबदारी साठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत .मात्र मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असून इंजेक्शन ,ऑक्सीजन याचा मोठा तुटवडा होत असून त्यासाठी तालुक्यातील जनतेने सामाजिक भावनेतून आपण सुरक्षित राहून इतरांना मदत करा .अकोले,राजूर येथे कोरोणा केयर सेंटर सुरू करण्यात येत असून यासाठी दात्यानी यासाठी मदत करा असे आव्हान केले .तहसीलदार मुकेश कांबळे म्हणाले यापुढील काळ जबाबदारीने वागण्याचे असून आजपर्यंत पाच हजार लोक बाधित झाले असून सध्या सर्व रुग्णालय फुल्ल असून उगाचच बाहेर फिरून प्रशासनाला कडक अमलब जावणी करण्यास भाग पाडू नका .यावेळी खाजगी डॉक्टरांनी मदत करण्याचे आव्हान केले . आभार भास्कर एलमामे यांनी मानले .
