जनतेज न्युज

मनविसे च्या बळकटीकरण करण्याकरीता विदर्भाचा दौरा – मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी

प्रतिनिधी, भंडारा : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी अमित राज ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर मनविसे हा मनसे चा एक महत्वाचा अंग आहे.त्यात मजबुती कशी आणता येईल,राज्यातील विद्यार्थी युवकांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अमीत ठाकरे यांच्याकडुन काय अपेक्षा आहे त्याच चाचपणी करण्याकरीता मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक २३ जुनपासुन मनविसेच्या पदाधिका-यांनी नागपूर इथुन विदर्भाचा दौरा सुरू करण्यात आला असल्याचे मनसे चे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी सांगीतले.ते आज भंडारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.या संवाद दौ-यात विद्याथ्र्यांशी संवाद साधुन त्यांच्या अडीअडचणी काय आहेत ते जाणुन त्या कशा सोडविता येईल याचा विचार करण्यात येणार आहे.तसेच शिक्षणप्रणालीमध्ये आमुलाग्र बदल घडविण्याकरीता व मागील अनेक वर्षापासुन विद्याथ्र्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याकरीता मनविसे बळकट होणे गरजेचे आहे.आणि त्याकरीताच मनविसे चा हा विदर्भ दौरा आयोजित करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखविली !मागील अडीच वर्षात सरकारतर्पेâ कुठेही जनहीताची कामे होतांना दिसुन आली नाही.त्यांच्याच पक्षात खुप मोठा असंतोष होता हे सर्वांना माहिती आहे.त्या पक्षाचे युवा नेते आमच्या जनहीताचे काम करणा-या आमच्या पक्षाबद्दल बोलले होते.त्यांच्याच पक्षातील लोकांनी बंड ठाकुन त्यांना त्यांची जागा दाखविली आहे असा उपरोधीक टोलासुध्दा हेमंत गडकरी यांनी कुणाचेही नाव न घेता यावेळी लगावला.