प्रतिनिधी , मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने इगतपुरी तालुक्यात मनसेचे सागर गवारी यांच्या पुढाकाराने स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात येत आहे. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपला पाठिंबा दर्शविला. या वेळी उपजिल्हा अध्यक्ष संदीप किर्वे, तालुका महिला आघाडीच्या पूनम राखेचा, तालुका अध्यक्ष मुलचद भगत, इगतपुरी शहराध्यक्ष सुमित बोधक, मनविसे उपजिल्हा प्रमुख गणेश उगले, मनविसे
तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, उपसरपंच विजय दराणे, घोटी शहर उपाध्यक्ष राजू राखेचा, राज जावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषेचा प्रसार व्हावा तिला अभिजात दर्जा मिळण्यासाठी दरवर्षी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येते. आपली मराठी बोली टीकावी तिचा सन्मान व्हावा म्हणून याची सुरुवात स्वाक्षरी पासून झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी दिली.
दोन गुजराती एकत्र आले तर ते गुजराती मध्ये बोलतात दोन कन्नड एकत्र आले तर ते कन्नड मध्ये बोलतात मग आपण देखील अन्य कुठल्या भाषे मध्ये न बोलता आपल्या मायबोलीतच बोलले पाहिजे असे किर्वे यांनी सांगितले. यावेळी वाहतूक सेना तालुकाध्यक्ष कृष्णा भगत, जनार्दन गतीर, संतोष बिन्नर, भगवान कवटे, अर्जुन कर्पे, रतन शेलार, मयूर मटाले, धिरज गौड आदींसह शेकडो मन सैनिक उपस्थित होते
