जनतेज न्युज

गोळीबार प्रकरणातील आरोपी गजानन तौर स्थानबद्ध

जालना: काही महिन्यांपूर्वी शहरात बिन बोभाटपणे किरकोळ भांडणातून गोळीबार करणारा गुंड गजानन तौर याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करून पोलीस प्रशासनाने त्याला स्थानबद्ध केलं आहे.गेल्या काही काळात तौर याच्या विरोधात शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्यासह जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्याच्या प्रवृत्तीत सुधारणा होण्यासाठी चंदनझिरा पोलीसांनी त्याला एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता.अखेर या प्रस्तावाला सकारात्मक घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिलेत.अखेर पोलिसांनी तौर याला हर्सूल येथे स्थानबद्ध केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.