जनतेज न्युज

शेकडो ब्रास अवैध रेतिसाठा जप्त भंडारा तालुका महसूल विभागाची कारवाई

प्रतिनिधी , भंडारा : भंडारा तालुका महसूल विभागाने भंडारा शहरालगतच्या ग्राम बेला येथे अवैध रित्या साठवणूक केलेला शेकडो ब्रास रेती साठा जप्त करीत भंडारा तहसील कार्यालयात जमा केला. या कारवाईमुळे रेती माफियाचे धाबे दणाणले आहेत. जप्त केलेला रेतिसाठा जवळपास दीडशे ब्रास असल्याची माहिती आहे.
भंडारा जिल्ह्यातील रेतीघा ट हे सोन्याचे अंडी देणारे आहे. येथील रेतीला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मागणी असून सोन्याच्या भावात रेतीची खरेदी विक्री होते. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती माफिया सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते. त्यातूनच अवैधरित्या रेतीची साठवणूक करून ती जास्त दरामध्ये विक्री करण्याचा गोरख धंदा येथील रेती तस्करांनी चालविला आहे.
भंडारा शहरा ला लागून असलेल्या ग्राम बेला येथील रिकाम्या जागेवर काही रेती तस्करांनी शेकडो ब्रास अवैधरित्या रेतीची साठवणूक केली होती. याची माहिती होताच भंडारा तहसील महसूल प्रशासनाने धडक कारवाई करीत सदर रितीसाठा जप्त केला.