प्रतिनिधी , बीड : पेट्रोल,डिझेल,गॅसचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.वाढत्या इंधन वाढीमुळे वाहन धारक चांगलेच अडचणीत आलेले पहायला मिळाले आहेत असे असतानाच खाद्य तेलाच्या भावानेही उचांकी गाठल्याने सर्व सामान्य नागरिक हतबल होत आहेत.
खाद्य तेलाच्या भावात वाढ झाल्याने तेल खावे की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.दरम्यान च्या काळात सोयाबीन, शेंगदाणा,सुर्यफुल यांसारख्या खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने महागाईमुळे नागरीक त्रस्त होत आहेत कधीकाळी ८० ते ९० रुपयांच्या घरात असलेले सोयाबीन तेल आज १२५ ते १३० रु प्रती लिटर घ्यावे लागत आहेत त्यामुळे जो माणुस पाच लिटर तेलाची खरेदी करायचे ते आता एक लिटर आर्धा लिटर तेलाचीच खरेदी करत असल्याचे तेल व्यापारी सांतायेत एवढेच नव्हे तर वाढत्या तेल भावामुळे ग्राहकांचे प्रमाण ही कमी झाले असल्याचे दुकानदार सांगतायेत.
