प्रतिनिधी , महाराष्ट्रात ज्यावेळी बीजेपी कुठेही नव्हती त्यावेळी स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना हिंदुत्वाचा हात देत बीजेपीचे अस्तित्व संपूर्ण महाराष्ट्रात उभे केले तसेच शिवसेना मुळेच महाराष्ट्रात बीजेपी उभी राहिली भाषण करणे केव्हाही सोपे असते मात्र महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की बीजेपीचा अस्तित्व हे शिवसेनेमुळेच उभा राहिला आहे अशी मत राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
