जनतेज न्युज

अनुकंपाधारकांचे नियुक्तीसाठी आमरण उपोषण

प्रतिनिधी , जळगाव : जळगाव महापालिकेत मागील ७ वर्षांपासून प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळाली नसल्याचा आरोप करत ही नियुक्ती तत्काळ मिळावी या मागणीसाठी अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील वारसांनी आज सोमवार ८ फेब्रुवारीपासून महापालिकेसमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. 
महापालिकेच्या दप्तर दिरंगाईमुळे अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळत नसून प्रतीक्षा सूचीवरील वारसांचे नोकारीचे वय उलटून गेल्यास त्यांना नोकरीची संधी  गमवावे लागेल. आज अनुकंपा नियुक्तीसंदर्भात सर्व शासन निर्णय, नियम अनुकूल आहेत. तसेच महापालिकेत पदे रिक्त असतांना देखील नियुक्ती मिळत नाही. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी वारसांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. महासभेत अनुकंपाधारकांच्या वारसांना एका महिन्याच्या आत नियुक्ती देण्यात यावेत असा ठराव २००५ मध्ये करण्यात आला होता. मात्र, या ठरावाची देखील अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी केला आहे.