जनतेज न्युज

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देशाच्या 130 कोटी जनतेला फसवू शकतात, मग उद्धव ठाकरे काय आहेत ?

प्रतिनिधी , देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देशाच्या 130 कोटी जनतेला फसवू शकतात, मग उद्धव ठाकरे काय आहेत? असे टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला. गृहमंत्री अमित शाह यांनी काल (रविवारी) सिंधुदुर्गमध्ये भाजप नेते काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या लाईफटाईम या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. तर अमित शाह यांचे भाषण देखील हा चुनावी जुमला असू शकतो, अशी टीका सावंत यांनी केली. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार? या मुद्यावर भाजप आणि शिवसेना यांच्यात महायुती तुटून शिवसेना बाहेर पडली. भाजपने मुख्यमंत्री पदासाठीचा दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आम्ही युतीतून बाहेर पडत असल्याचे उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र, आपण असा कोणताच शब्द दिलेला नव्हता, असा खुलासा गृहमंत्री अमित शाह यांनी काल आपल्या भाषणादरम्यान केला. त्यामुळे पुन्हा एकदा त्यावेळी काय झालं? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.