जनतेज न्युज

महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षणापेक्षा अर्णब आणि कंगनाच घर पाडणं महत्वाचं वाटत – गोपीचंद पडळकर

प्रतिनिधी , सोलापूर : महाविकास आघाडीला सरकारला आता वर्ष पूर्ण होत आहे.
दरम्यान महाविकास आघाडी सरकार हे कुठल्याच समाजाच्या आरक्षाविषयी प्रामाणिक नाही आहे.
त्यातल्या त्यात मराठा समाजाच्या आरक्षणविषयी तर महाविकास आघाडी सरकार अजिबात प्रामाणिक नाही,
कारण अर्णब गोसावी प्रकरणात राज्य सरकार लाखो रुपये खर्च करूनं वकील लावत मात्र मराठा आरक्षणाची साधी कागदपत्र वकीलपर्यंत पोहंचवता येत नाहीत…
कंगनाच घर पाडणं महत्वाचं वाटत मात्र मराठा आरक्षणसंदर्भांत बैठका घेता येत नाहीत…
त्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यापासून महाविकास आघाडी सरकार हे बाजूला पळत आहे.
ज्या सोयी सवलती आदिवासींना आहेत त्या धनगरांना ही देण अनिवार्य आहे मात्र महाविकास आघाडी सरकारचे नेते हे विरोधात असताना पिवळे फेटे बांधून,अंगावरती घोंगड,हातात काट्या घेऊनं विधान भवनापुढे फोटो काढायचे मात्र सत्तेत जाताच या सर्व नेत्यांची दातखीळ बसली आहे.
मागच्या फडणवीस सरकारने धनगरांसाठी दिलेले 1 हजार कोटी रुपये ही या सरकारने धनगरांसाठी उपयोगात आणले नाहीत असा आरोपी ही भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवरती केला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर हे आज पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ सोलापूर दौऱ्यावर आले आहेत.