जनतेज न्युज

नव दांपत्यांनी केले गावाला संगणक केंद्र दान.. बाबासाहेब यांच्या पे बॅक टू सोसायटी विचारांचे पालन..

प्रतिनिधी , अमरावती : सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने लग्नकार्य होणाऱ्या अगणित खर्चाच्या बचतीतून मंगल परिणामाच्या निमित्ताने गावातील समाज मंदिरामध्ये गावातीलच गरजुवंत विद्यार्थ्यांसाठी लग्नदिनी संगणक सुरु केले, या युगात विद्यार्थ्यांच्या अंगी संगणकीय ज्ञान रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांना दृकश्राव्य साधना च्या माध्यमातून त्यांना अधीक प्रभाविपणे शिक्षण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संगणक केंद्र दान करण्याचा संकल्प अमरावती जिल्ह्यातील शेंदोळा खुर्द येथील निलेश व जया या नव वर-वधू नी केला.
कोरोना काळात अनेकांनी आपले मोठे लग्न सोहळे हे उरकते घेतले जास्त वाजांगाजां व लोकांच्या गर्दीला मर्यादा ठेवून शासन विवाह सोहळ्याला परवानगी देत आहे त्यामुळे अनेकजण आपल्या मोजक्या लोकांच्या उपस्तित मध्ये लग्न सोहळा पार पाडत आहे मात्र तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील निलेश सूर्यप्रकाश जवंजाळ व जया या नव दांपत्यांनी आदर्श विवाह करत गावातील विद्यार्थ्यांकरीता संगणक केंद्र दान केले.तर त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमा बाहेर बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगे बाबा,बुद्ध, तुकडोजी महाराज यांच्यासह थोर महापुरुष यांच्या विचारांचे फलक पाहायला मिळाले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे पे बॅक टू सोसायटी या विचाराला खऱ्या अर्थाने आचरणात आणू आपल्या कमाईचा विस्वा हिस्सा हा समाजासाठी दान करणे हे आपले कर्तव्य आहे याच उद्देशाने निलेश व जया यांनी आपल्या मंगल परिणय दिनी गावातीलच समाज मंदिराची रंगरंगोटी करून याठिकाणी विद्यार्थ्यांकरीता सात संगणक दान केली, सामाजिक कृतज्ञता संगणकीय ज्ञान विद्यार्थ्यांना गावा पातळीवर निशुल्क मिळावे हा उद्देश समोर ठेवून गाव विकासाकरिता कौतुकास्पद उपक्रम राबविला त्यांच्या दान कार्याचे मोठे कौतुक होत आहे तर यावेळी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर,सिनेट सदस्य रवींद्र मुद्रे यांच्या सह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून नव वर वधूना आशीर्वाद दिला व त्यांच्या कार्याचे कौतुक केले.