प्रतिनिधी , विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा म्हणून दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यात आला असून येत्या एप्रिल – मे महिन्यात या परीक्षा घेतला जाईल असा विचार सुरू असल्याचेही यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितले
काही ठिकाणच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शाळेच निर्जंतुकीकरण, शिक्षकांच्या rt-pcr चाचण्या केल्यानंतरच त्यांना क्लासेस घेऊ दिले जाणार आहे यामुळे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात एक विश्वासाचं नातं निर्माण करायचं नंतर टप्प्याटप्प्याने सगळ्या शाळा सुरू करायचा असा निर्णय घेण्यात आला,असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अमरावती येथे सांगितले. .खाजगी शाळांनी जी अमाप फी वाढवली त्यासंदर्भात उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असून उच्च न्यायालयाकडून पालकांना दिलासा मिळेल असा आशावाद वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला
