जनतेज न्युज

फडणवीसाना पुन्हा मुख्यमंत्री बनवा मी त्यांना आरक्षण देण्यास भाग पडतो – उदयनराजे भोसले

प्रतिनिधी , मराठा आरक्षणावर आज साताऱ्यात खा.उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेत उदयनराजेंनी शरद पवारांवर निशाणा साधत मंडल आयोगावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला गेला नाही असा शरद पवारांच्यावर निशाणा साधला.
जर मराठा आरक्षणाचा प्रश्न उदयनराजे आणि संभाजी राजेंनी सोडवायचा असेल तर त्या पदावर संभाजीराजेंना बसवा असा शरद पवारांना सवाल केला आहे.
काय म्हणालेत उदयनराजे पाहुयात..

जातीचे राजकारण करणाऱ्यांनी राजीनामे द्या

मराठा समाजाला किरकोळीत घेऊ नका

मराठा आरक्षण का झाले नाही याचा त्या त्या वेळच्या सत्तेतील नेत्यांना प्रश्न विचारा

कोणत्या ही समाजातील नागरिकांनी गैर समाज करूनये मात्र मराठा समाजावर अन्याय होतोय तो दूर व्हावा

इतर कोणत्या ही समाजाचे आरक्षणाला धक्का न लावत मराठा समाजाला आरक्षण द्या

मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्या सर्वांना माझा सवाल आहे

आंदोलने केली की आंदोलकांवर दबाव आणला जातो आणि त्यांना तुरुंगात टाकले जाते

माझा स्वतः चा विचार आहे तो कोणा पक्षाचा विचार नाही

मराठा समाजाचा मतासाठीच वापर केला गेला

संभाजीराजे यांची त्या पदावर नेमणूक करा आम्ही प्रश्न एका दिवसात सोडवतो :-उदयनराजे यांचा शरद पावर यांचा प्रतिसवाल

स्वतःचे बगा मग देवेंद्र फडणवीसांवर आरोप करा